
जवळगाव हे गाव नांदेड जिल्ह्यातील पूर्वीच्या हदगाव तालुक्याचे विभाजन होऊन हिमायतनगर तालुक्याची निर्मिती झाली त्याअंतर्गत जवळगाव आहे महसूल विभागाचे मंडळ कार्यालय आहे. या गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे अनेक जाती धर्माचे लोक असून सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतात येथे मंदिर, मज्जित, दर्गा असे धार्मिक स्थळे आहेत. जवळगाव नगरीचे कुलदैवत म्हणजे येथील हेमाडपंती शिवकालीन माता जगदंबा मंदिर हे आहे.
मौजे जवळगाव हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने तीन वेळा पावन झाले असून महाराजांनी येथे किर्तन करून सन 1965 ला येथे गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून येते महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रामधुन चा कार्यक्रम आयोजित केला जातो तसेच दररोज प्राप्तकाळी प्रार्थना 05.30 मिनिटांनी ते 06.30 पर्यंत भजन, प्रवचन, योगा व ग्रामगीतेचे ध्यान नित्यनियमाने पार पाडले जाते.
राष्ट्रसंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत समस्त गावकऱ्यांच्या एकत्र येऊन लोकसहभागातून व शासनाचे विविध योजनांची सांगड घालून गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड, बंदिस्त गटारात द्वारे सांडपाणी व्यवस्थान करण्यात आले आहे घनकचरा व्यवस्थापनसाठी ओला सुका व प्लास्टिक कचरा विलगिकरण करण्यात येऊन घंटागाडी चालविण्यात येत आहे. व तसेच गावातील भिंती बोलक्या करण्यासाठी घोषवाक्य व भिंती पत्रके लिहिण्यात आली आहेत. गावात सुसज्ज अशा प्रि- प्रायमरी शिक्षणासाठी अंगणवाडी उभारण्यात आल्या आहेत. शुद्ध पिण्याचे पाण्यासाठी नियमित तीन जल शुद्धीकरण यंत्र द्वारे पाणी पुरवठा केला जातो. गावात प्रत्येक घरी मा. आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या संकल्पनेतून व सहकार्याने कल्पवृक्ष (नारळ) लागवड उपक्रम राबविण्यात आला आहे. व तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात फळबाग व इतर वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. स्मशानभूमी परिसरात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात आनंदवन घनवन मियावाकी पद्धतीने तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.तसेच येथे थोडेसे मायबापा साठी सुसज्ज असा वाचनालयसह कक्ष स्थापन करण्यात आला आहे.








